बोळेगाव ग्राम पं.येथे दिव्यांग दिना निमित्त दिव्यांगाचा सत्कार ; तर बिलोली तालुक्यातील इतर ग्राम पंचायतींना दिव्यांग दिनाचा विसर !

बिलोली तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवकांना दिव्यांग दिनाचा विसर की, दुर्लक्ष !

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
मौजे बोळेगाव येथे ग्राम पंचायतच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्य जयंती साजरी करण्यासाठी ग्रामसेवक डि.आर.हांबिरे यांनी पुढाकार घेऊन दिंव्याग बांधवांना निमंञित करून सरपंच सौ.राधीका बोधनापोड यांच्या हस्ते दिंव्यांगांना पेडा भरुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तर बिलोली तालुक्यातील ग्राम पंचायततींना दिंव्यांग दिनाचा विसर पडला असल्याचे दिसुन आल्याने दिंव्यांग बांधवात तिवृ नाराजगी होत असल्याची चर्चा बोलल्या जात आहे.
सदरिल तालुक्यातील ग्राम.पं.चे सरपंच, ग्रामसेवकांना दिव्यांग दिनाचा विसर पडला की, दुर्लक्ष असा अरोप दिव्यांग बांधव व भगीनीं कडून होत आहे.
महाराष्ट्रातील शासकीय, निम शासकीय कार्यालयात दिव्यांग दिन साजरा केले असल्याचे दिसुन आले नाही, पण बिलोली शहरात व तालुक्यात दि.३ डिसेंबर रोजी कांही तुरळक ठिकाणी दिंव्यांग दिन साजरा करुन दिव्यांगाचा सत्कार व सन्मान करण्यात आला. त्या पैकी बोळेगाव येथील सरपंच सौ. राधीका बोधनापोड, ग्रामसेवक डि.आर. हांबिरे यांनी दिव्यांगा बद्दल आदर  असल्यामुळे बोळेगाव ग्राम पंचायत मध्ये दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी त्यांना निमंञित करुन दिव्यांगांना पेडा भरुन सत्कार व सन्मान केला असल्याने दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा व आनंद मिळाला आहे.
जिल्ह्यात व तालुक्यातील ग्राम पं.च्या वतीने दिव्यांग दिन साजरा करण्यात आला नसल्याने सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर दिव्यांग बांधवांची नाराजी तर दुसरीकडे बोळेगाव चे ग्रामसेवक, सरपंच यांचे दिव्यांग बांधवांनी आभार मानले असल्याचे ऐकायला मिळाले.
 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या