दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निधीसाठी लोहा शहरातील दिव्यांगाचा मोर्चा पालिकेवर धडकला !

(विशेष प्रतिनिधी – रियाज पठान)
केंद्र व राज्य शासनाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 37 ब मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजना अंतर्गत 5 टक्के निधी वाटप करण्याचे आदेश दिले खरे परंतु लोहा नगरपरिषद हद्दीतील 120 दिव्यांग व्यक्तींना सन 2020 मधील उर्वरित लाभ व सन 2019 मध्ये लाभ आजतागायत प्राप्त झालेला नाही.

त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी हा प्राधान्याने राखीव ठेवणे गरजेचे आहे. प्रतिवर्षीप्रमाणे ते मार्च महिन्यापर्यंत प्राप्त व्हायला हवे होते यासंदर्भात नगरपरिषद कार्यालयाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने संतप्त झालेल्या लोहा शहरातील जवळपास 120 दिव्यांगाचा मोर्चा आज दिनांक 5 जुलै रोजी लोहा न प कार्यालयावर धडकला.
कोविड व सतत होणाऱ्या लॉकडाउन मध्ये मागील वर्षी भरापासून ते सर्व लाभार्थी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत याबाबत प्रशासकीय आहेच परंतु मानवी दृष्टिकोनातून सुद्धा त्या दिव्यांग लोकांना प्राधान्याने मदत करणे गरजेचे होते परंतु असे झाल्याचे दिसून येते नाही याबाबतीत मुख्याधिकारी नगरपरिषद लोहा यांना शहर काँग्रेस कमिटी, प्रहार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मातंग समाज तालुका संघटनेच्यावतीने तात्काळ दिव्यांगा चा लाभ देण्यात यावा यासाठी निवेदन आधारे निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला होता तरीदेखील त्यावर कोणतीच कारवाई लोहा शहरातील नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली नसल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांचा पालिकेवर धडक मोर्चा धडकला पालिकेकडून दिव्यांगांना पाच टक्के निधी देण्याबाबत गंभीरता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे वसंत पवार, सोनू संगेवार, पांडुरंग दाढेल, अनिल पाटील चव्हाण, पंचशील कांबळे, प्रहार संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष माऊली गीते, पंकज सिंह परिहार, पांडुरंग शेटे, शेख, व्यंकट पाटील पवार, अनिल ताडेल, रोहित कटकमोड, श्याम पाटील नळगे, भूषण दमकोंडवार, बालाजी जाधव अमोल महामुने आदिसह लोहा शहरातील बहुसंख्य दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या