दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथील तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करून दिव्यांगांच्या विविध शासन निर्णयातील अनेक न्याय मागण्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
यासाठी गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आपणास व संबंधित शासकीय विभागास निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढूनही मां.माजी जिल्हाधिकारी राऊत यांनी सात बैठका व एक सुनावणी घेऊन आदेश व निर्देश दिल्यानंतर एक हि प्रश्नाचे साधे उत्तर मिळाले नसल्यामुळे व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या द्वारे आजपर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या कल्याणासाठीच्या विविध शासन निर्णयांची व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न करता नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ व दफ्तर दिरंगाई कायद्यासह सेवा हमी कायद्या अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व शेकडो दिव्यांगांनी आपल्या नावासह सह्या करून दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनी रितसर तक्रार दाखल केली होती.
परंतु त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याकडून काय कारवाई करण्यात आली आहे हे आम्हाला अद्याप कळले नाही तसेच संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील आमच्या निवेदनांची कुठलीच दखल न घेतल्यामुळे आम्ही संतप्त शेकडो दिव्यांग बांधव आणि भगीनी दिनांक २५ जानेवारी २०२५ जागतिक मतदान जागृती दिनी दिव्यांग वृध्द निराधाराना न्याय हक्क मिळत नसेल तर मतदान कार्ड परत घ्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे केल्यानतर १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ची संबंधित अधिकारी यांना वेळ देऊन निर्णय न झाल्यामुळे दि.२८ फ्रेबु.२०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नांदेड दौऱ्यात दिव्यांग घेरावा आंदोलन पुकारले असता दिव्यांग शिष्टमंडळासोबत भेट देऊन सुद्धा अद्याप वरीष्ठाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंडळ नुतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत करुन दिव्यांगाना न्याय हक्कासाठी मागणी केली. पंधरा दिवसांचा कालावधी मा.जिल्हाअधिकारी यांनी दिल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल हे कडक तापमानात नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार सर्व गटविकास अधिकारी यांना निवेदन दि.२० फेब्रुवारी ते १२ मार्च २०२५ संघटनेच्या वतीने भर ऊन्हात दिव्यांग पडत झडत निवेदन देत आहेत.
दि.१२ मार्च २०२५ रोजी नायगाव तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे शिष्टमंडळ चंपतराव डाकोरे पाटिल, नागोराव बंडे पाटील, गजानन चव्हाण पाटील, विठ्ठलराव बेलकर, ज्योती पांचाळ, हनुमंत पांचाळ, बाबाराव कऊटकर, इत्यादी पदाधिकारी होते असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy