बिलोली येथे दीपावली सणानिमित्त दिवाळी पहाट हा गीत संगीताचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न.

[ बिलोली प्रतिनिधी- सुनिल जेठे ]
बिलोली येथे दिनांक ३१ ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी सहा वाजता दिवाळी सणानिमित्त नरक चतुर्दशीच्या दिवशी श्री शिव हनुमान मंदिर, देशमुख नगर, बिलोली येथे मराठी चित्रपट गीत, भावगीत, भक्ती गीत असा विविध गीतांचा भव्य असा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी श्री शिवाजी मोकळे आणि संच धर्माबाद यांनी एकापेक्षा एक बहारदार अशी भक्तीगीत सादर केली. यावेळी सौ. कविता गुडमवार उमरी, राजेश घोगरे सगरोळी, संतोष धर्माबादकर यांनी सरस अशी गीत रचना सादर केल्या. तसेच याच कार्यक्रमात बिलोलीतील अनेक स्थानिक कलाकारांनी देखील गीतं सादर केली. यावेळी बिलोलीचे माजी नगराध्यक्ष श्री यादरावजी तुडमे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

प्रमुख अतिथी म्हणून बिलोली स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक श्री शशिकांत गुप्ता, डाॅ.कल्याणपाड, माजी शिक्षणाधिकारी के.पी. सोने , आबाराव संगनोड, अंबेराव, डॉ.मनोज शंखपाळे, दत्ता रायकंठवार,माधव फुलारी, विजय होपळे ,धरमुरे , अनिल गायकवाड, मक्कापल्ले,कु.श्रुती तुडमे, श्रीमती मीरा संगणोर, श्रीमती संगिता गंगमवार , सौ.हेमा चौधरी सौ. विभुते अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महिलांनी देखील आपल्या रचना सादर केल्या.याच कार्यक्रमात सगरोळीचे संगीतशिक्षक राजेश घोगरे यांनी देखील विविध पद रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांचा शाल आणि पुष्पहारणे स्वागत करण्यात आले. तसेच या संगीत कार्यक्रमानंतर दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी फराळाचा आस्वाद घेतला. सकाळी सुरू झालेला हा कार्यक्रम तीन तास चालला. अतिशय बहारदार अशा विविध गीतांच्या कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला.
मागील वर्षीपासून बिलोली येथे या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.यावेळी या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा.डॉ.गोपाळ गोपाळ चौधरी यांनी केले.तसेच श्री शिव हनुमान मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी डॉ.भीमराव अंकुशकर, इंद्रजीत तुडमे, डाॅ.चौधरी, गंगासागर कलमुर्गे, प्रभू शिवशेट्टे, शंकर कोंडलवाडे, डाॅ.कासराळीकर, संतोष दुडले, शंकरराव कलमुर्गे, शिवा गायकवाड, बाबुराव मंचलवाड तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतींनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
तसेेच स्थानिक व परिसरातील शिव भक्तांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते कलाकारांना मानधन देण्यात आले. या प्रसंगी अनेक उपस्थित महिला व पुरुषांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.अशाच प्रकारे बिलोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन शिव हनुमान मंदिर संस्थान करीत असते .यापुढेही त्यांनी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे.अशा भावना व्यक्त केल्या. प्रा.डॉ.गोपाळ चौधरी यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या