नायगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करा – हरिहरराव भोसीकर !
[ नायगाव बा.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव बाजार तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात चालू असून नायगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करून हे अभियान प्रभावीपणे नायगाव तालुक्यात राबवा व तालुक्यात पक्ष संघटन वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अधिक ताकदीने सामोरे जावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा बैठक नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष व निरीक्षक सुभाषराव गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी.जांभरूणकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. प्रांजली रावणगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गजानन पापंटवार,राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष विश्वांम्भर भोसीकर,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियंका कैवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष तथा बैठकीचे आयोजक विश्वनाथ बडूरे यांनी केले.यावेळी गजानन पापंटवार,प्रांजली रावणगावकर,डी. बी. जांभरूणकर,सुभाषराव गायकवाड, प्रियंका कैवारे आदींनी या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी या बैठकीचा अध्यक्षीय समारोपात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी नायगाव तालुक्यातून अधिकाधिक सदस्य नोंदणी करू असे सांगितले.
यावेळी बरबडा,व टाकळी येथील अविनाश शिंदे, सोनू वाघमारे, कपिल कांबळे, रावसाहेब सुर्यतळ, चांदोजी सुर्यतळ, बालाजी मोरे, महाजन धुमाळे, कोंडीबा हासेवाड, बालाजी भोसीकर यांनी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाचिटणीस पंढरी पा. डाकोरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम, जेष्ठ पत्रकार बापूराव बडूरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव बेंद्रीकर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष केरबा रावते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सातेगावकर, संजय चव्हाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष राजेश ढगे, रामचंद्र बोईनवाड, त्र्यम्बक मद्देवाड, आनंदा सुर्यतळ, बळवंतराव मोरे, आनंदा गायकवाड, विलास ढगे, बाबुराव कवळे, चंदर कांबळे, बालाजी पचलिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.