लोह्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.दिनेश राठोड यांचे अभिष्टचिंतन !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हजारो गोरगरीब रुग्णावर उपचार करुन त्यांना बरे करणारे रुग्णांचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे लोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. दिनेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा लोहा पत्रकार संघाच्या वतीने पुष्पहार घालून अभिष्टचिंतन करण्यात आले.
 यावेळी पत्रकार विलास सावळे, पत्रकार संजय कहाळेकर, पत्रकार शिवराज पाटील पवार, छायाचित्रकार विनोद महाबळे आदी उपस्थित होते.
तसेच डॉ. दिनेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ग्रामीण रुग्णालयात त्यांचा सत्कार वैद्यकीय अधीक्षक डॉ.बारी, डॉ.मोटे, डॉ.जाधव, डॉ.पूर्वा सरकार, १०८चे चालक ससाणे, चव्हाण, केंद्रे, सचिन मोटरवार, होळगीर, आदींनी शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या