धर्माबादेत मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट शालेय विद्यार्थ्यांसह, नागरिकांचे जीव धोक्यात !

(धर्माबाद प्रतिनिधि – नारायण सोनटक्के)

शहरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या मुक्त संचारामुळे लहान बालके, महिला, शालेय विद्यार्थी  यांना अतोनात त्रास होत असून बहुतांश ठिकाणी कुत्र्यांच्या चाव्यामुळे विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.

धर्माबाद शहरात सकाळी व सायंकाळी पटेल नगर,  देवी गल्ली, आर्य भवन जवळ यासह काही ठिकाणी कोचिंग क्लासेस आहेत. याठिकाणी येणारे असंख्य विद्यार्थी विद्यार्थ्यींनीवर  या मोकाट कुत्र्यांचा हल्ला होत असतांना दिसतो आहे.

कुत्रे मागे लागल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थीनी आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत आहेत प्रसंगी उघडे असलेल्या दुकानात अथवा घरामध्ये गेल्यामुळे अनेकांनचे जीव वाचत आहेत. तसेच शहरातील अनेक प्रभागात फुले नगर, रमाई नगर, शिव मंदीर परिसर, कॉलेज रोड, आंध्रा बस स्टँड, औद्योगिक वसाहत परिसर यासह अनेक ठिकाणी कुत्र्यांचा कळप मोटारसायकल, सायकल, चारचाकी वाहने इत्यादींच्या मागे लागत आहेत.

त्यामुळे मोटारसायकल स्वारांचे छोटेमोठे अपघात होत आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

ताज्या बातम्या