मुलाच्या वाढदिवसा वर खर्च होणारी रक्कम दिली सेवाभावी संस्थेला !

  • धर्माबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नीलम कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम
[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
     मुलाच्या वाढदिवसावर अवास्तव खर्च न करता वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम सेवाभावी संस्थेला मदत देऊन एक सामाजिक बांधिलकी धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे व त्यांचे पती निर्मिती अकॅडमी पुणेचे संचालक प्रदीप वाघमारे या दांपत्याने जपली असून त्यांच्या या उपक्रमाबद्दल दाम्पत्याचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.
     धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे व त्यांचे पती निर्मिती अकॅडमी पुणे चे संचालक प्रदीप वाघमारे या दाम्पत्याचा मुलगा सृजन नीलम प्रदीप वाघमारे यांचा १३ डिसेंबर रोजी पहिला वाढदिवस होता परंतु या उच्चशिक्षित दांपत्याने मुलाच्या वाढदिवसावर अनाठायी खर्च न करता ती रक्कम शैक्षणिक उद्दिष्ट्ये घेऊन उद्याची सक्षम पिढी घडवणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था नागपूर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन युपीएससी-एमपीएससी प्रशिक्षण केंद्र नांदेड या दोन समाजसेवी संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.
       नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सेवारत असलेल्या नीलम कांबळे व त्यांचे पती निर्मिती अकॅडमी पुणे चे संचालक प्रदीप वाघमारे या उच्चशिक्षित दांपत्यास शिव-लहू फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ यांच्या विचारांची अर्थातच आंबेडकरी विचारधारेची ओळख आणि समतामूलक,मानवतावादी सेवाभावी विचार मूल्यांची जाणीव झाली तेव्हापासून स्व आणि कौटुंबिक विकासाबरोबरच सामाजिक उत्थानासाठी हे दांपत्य अविरत झटत आहे. या आदर्श दाम्पत्याचा मुलगा सृजन नीलम प्रदीप वाघमारे यांचा १३ डिसेंबर रोजी प्रथम वाढदिवस होता. हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा व्हायला पाहिजे असे अपेक्षित असताना सामाजिक जाण व भान असलेल्या या दाम्पत्याने होणाऱ्या अनाठायी खर्चास फाटा दिला व वाढदिवसावर खर्च होणारी ती रक्कम शैक्षणिक उद्दिष्टे घेऊन उद्याची एक सक्षम पिढी घडविणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था नागपूर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर मिशन युपीएससी-एमपीएससी प्रशिक्षण केंद्र नांदेड या दोन समाजसेवी संस्थांना दिली.
        प्रतिकूल परिस्थितीतून या दाम्पत्याने उच्चशिक्षण घेतले व ते आज या पदावर सेवाकर्तव्य बजावत आहेत. आपण इथवर पोहोचलो आहोत परंतु आजही समाजातील अनेक जण प्रतिकूल परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांचा संघर्ष पाहता आपण ज्या समाजातून आलो आहोत त्यांचे काही देणे आहोत व समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे. याची जाण असल्याने या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उच्च शिक्षण घेत असलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक खारीचा वाटा म्हणून ती रक्कम या सेवाभावी संस्थेकडे सुपूर्द केली आहे प्रेरणादायी व स्तुत्य असा समाजसेवी उपक्रम राबविणाऱ्या या दांपत्याचे विविध क्षेत्रातून व समाजातील अनेकांतून अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या