डोंगरगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाराशिवचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतली दखल !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)

लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथील ऊस उत्पादक ११ शेतकऱ्यांचे ३५ एकर वरील ऊसाला शार्क सर्किटमुळे अचानक आग लागली होती.त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट कोसळले होते.

आगीनंतर शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना संपर्क साधला परंतु त्याची कोणीही दखल घेतली गेली नाही.परंतू धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी वेळीच दखल घेऊन जनरल मॅनेजर व शेती विभाग यांना सुचना देऊन तातडीने ७ ते ८ टोळ्या पाठवून दिल्या.अवघ्या चारच दिवसात गाळपास आणला.

धाराशिव चे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांच्या समयसुचकतेमुळे आणि संवेदनशील त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे लाखो रुपयांचे नुकसान टाळले या भावनेतून शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन धन्यवाद मानले. श्री पाटील यांनी आपण जे केले ते आपले कर्तव्य होते असे म्हणून शेतकऱ्यांचे आदरपूर्वक आभार मानले.

यावेळी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष खंडेराव पाटील जाधव, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, सुहास शिंदे,जनरल मॅनेजर डाके, शेती विभाग अधिकारी शिंदे, चंद्रशेखर जाधव ,राघोबा जाधव, सौ. पुष्पाबाई जाधव,माधव जाधव, उमाकांत जाधव ,सुर्यकांत मुंदाळे, संतोष जामगे व ऊस उत्पादक संघाचे सदस्य डोंगरगाव चे ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या