डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची दुरावस्था !

प्रतिनिधि खेड-रजनीकांत जाधव 

 

खेड़ नगरपालिका कार्य क्षेत्रातील सम्राट अशोक नगरच्या मध्य भागी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र काही वर्षा पूर्वी होते. परंतु ते चोरीला गेली की काय अशी शंका जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे.

त्याठिकाणी मैदान आहे,त्याच्यामध्ये गुडघ्या इतके गवत वाढलेले आहे. आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. या मैदानाच्या आसपास जवळजवळ चारशे ते पाचशे घरांची लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी सौरउर्जा बल्ब आहेत परंतु ते कित्येक दिवस बंद स्थितीत आहेत.

वेळोवेळी नगरपालिकेकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन देखील ते दिवे लावले जात नाही.मग अनुसूचित जातीचा फंड खेड नगरपालिकेमध्ये आहे तो जातो कुठे? असा काही तरुणांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे.

त्याचप्रमाणे बाजूला अशोक सम्राट नगर स्तंभ आहे या स्तंभाचे इस्टीमेट तयार होऊन तीन वर्षापूर्वी काम चालू होणार होते. तो रिझर्व असलेला निधी गेला कुठे? नगरपालिकेच्या त्या वार्डच्या नगरसेवकांनी त्याचे काय केले? हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे.

ज्या आवश्यक सुविधा हव्या आहेत त्या देखील नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र बांधण्यात आले नाही तर तरुण पिढी उग्र आंदोलन व नगरपालिकेच्या समोर करतील याची नगरपालिका प्रशासनाने, नगरसेवकांनी व नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी दखल घ्यावी.

आणि रिझर्व असलेला पैसा त्वरित खर्च घालून ते सांस्कृतीक केंद्र उभे करावे.

प्रथमत: तेथील घाण कचरा स्वच्छ करून त्या मैदानाच्या सभोवती सौरऊर्जा बल्ब लावाव्यात. ती भूमी किंवा ते मैदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे केंद्राचे ठिकाण आहे. सौर ऊर्जा लावून ते ठिकाण प्रकाश मय करून जनतेला दिलासा द्यावा आणि सूचित केलेली कामे त्वरित करावी हीच जनतेची मागणी आहे..

ताज्या बातम्या