डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या ८ व्या स्मृतीदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात सकाळी निर्भय वाॅक संपन्न !

(रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे)
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या ८ व्या स्मृतीदिना निमित्त रायगड जिल्ह्यात सकाळी प्रत्येक शाखेकडून निर्भय वाॅक करण्यात आले व प्रधानमंत्री,मुख्यमंत्री यांना डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या अक्षम्य दिरंगाई बाबत निवेदन देण्यात आले.

 

तसेच सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाराष्ट्र अंनिस व जिल्ह्यातील समविचारी संघटना कार्यकर्ते यांचे सोबत आँनलाईन अभिवादन व निर्धार रॅली घेण्यात आली.

यात राष्ट्र सेवा दल चे अल्लाउद्दीन शेख, स्वदेश फाउंडेशन चे तुषार इनामदार, भारतीय महिला फेडरेशन च्या मोहिनी गोरे , सुरभी स्वयंसेवी संस्था च्या सुप्रिया जेधे, ग्राहक पंचायत चे प्रा. जोगळेकर, अखिल भारतीय बौद्ध महासंघ चे अनंतराव शिंदे, प्रा.डॉ.अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.पाटकर, राज्य सरचिटणीस नितीन राउत व रायगड जिल्हा मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह डॉ.डोंगरे, निलेश साळवी ( मुंबई ) यांनी देखील मनोगत व्यक्त केले व अभिवादन केले.

दोन सत्रात चाललेल्या या रॅली च्या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन राज्य पदाधिकारी आरती नाईक यांनी तर दुसर्या सत्राचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव संदिप गायकवाड यांनी केले.
यावेळी रायगड जिल्ह्यात ८ नविन संपर्क शाखा व शाखा प्रमुख याची निवड जाहीर करुन डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना जिल्ह्याच्या वतीने कृतीशील अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक व जिल्हा निर्धार व्यक्त करताना जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच संपर्क शाखांना क्रियाशील शाखा तयार करुन अजून शाखा वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला .

यावेळी अलिबाग, पनवेल, खोपोली, कर्जत, मानगाव, म्हसळा व तळा शाखा पदाधिकारी यांनी देखील अभिवादन व निर्धार व्यक्त केला.
जिल्हा सांस्कृतिक विभाग, पनवेल शाखा व खोपोली शाखा यांनी तीन गीत सादर केली. सदर रॅली साठी युसुफ मेहेर अली सेंटर, साने गुरूजी स्मारक, कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन, उल्काताई, सुरेखा ताई दळवी, वैशाली पाटील, वैशाली ताई मकदूम, चित्रलेखा ताई पाटील यांनी देखील सदिच्छा कळविल्या.
सदर रॅली साठी सर्व जिल्हा पदाधिकारी प्रभाकर नाईक, महेंद्र नाईक, निर्मला फुलगावकर, रोहिदास गायकवाड, प्रियांका, प्र.सचीव मनोहर तांडेल, प्रा.डॉ.लोखंडे, महेंद्र ओव्हाळ, महेंद्र पाटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा अ.नि.स. कार्यवाह प्रा.डॉ.संजय बेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या रॅली मध्ये अनेक संघटनांचे कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. महाराष्ट्र अंनिस चे संपर्क शाखा प्रमुख अर्जून भगत, प्रा. डोंगरे, प्रा.इंगळे, प्रा.तुपारे, आनंद गायकवाड, शिवा॑गी गोडबोले, रोहिदास कवळे, यशवंत ठाकूर यांनी देखील मनोगतातून शाखा बांधणी चा निर्धार व्यक्त केला‌ .
– ( विनयकुमार सोनवणे कार्याध्यक्ष, रायगड जिल्हा )
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या