बालाजी पेटेकर चित्रकला,रांगोळी जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी:- गजानन चौधरी ]
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 87 दक्षिण नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेस स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला.मल्टीपर्पज हायस्कूल नांदेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत खतगाव ता.बिलोली येथील कलाध्यापक,बालाजी पेटेकर खतगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.आणि त्यानंतर झालेल्या जिल्हास्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेतही बालाजी पेटेकर खतगावकर प्रथम क्रमांक पटकावले.. 
मत सुदर्शन घेऊन हाती,विसरू वंश,धर्म,जाती… निरपेक्ष मतदानांनी जोडू लोकशाहीची नाती.. असा सुंदर संदेश त्यांच्या रांगोळीतून दिसून आला.
 निवडणुकीची टक्केवारी वाढली पाहिजे,सर्वांनी मतदान केलंच पाहिजे अशा आशियाची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविता जोशी मॅडम,प्रा.राजेश कुलकर्णी,संजय भालके सर यांनी काम पाहिले. यशस्वी स्पर्धकांचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, नितीश कुमार बोलेलू, राजकुमार कोतुरवार,संतोष शेटकार,तहसीलदार प्रवीण पांडे,अभय कुमार दांडगे, मुख्याध्यापक सुनिल दाचावार सर, सारिका अचमे,आढे सर,हनुमंत राठोड यांनी स्वागत केले. सिनेकलावंत,कवी,कथाकार,चित्रकार,शिल्पकार,नाट्य कलावंत, मिमिक्री आर्टिस्ट, गायक,सुलेखनकार अशा बहुआयामी  अष्टपैलू कलावंत असलेल्या बालाजी पेटेकर सर यांनी यापूर्वीही विविध जिल्हास्तरीय रांगोळी आणि चित्रकलासह इतर स्पर्धेतही अनेक प्रथम क्रमांकाची पारितोषिक पटकावली आहेत.अशा हरहुन्नरी अष्टपैलू विद्यार्थी प्रिय कलाध्यापकास एकाच वेळी मिळालेल्या या दुहेरी यशाबद्दल त्यांचे मित्र परिवार,शिक्षक,कवी.साहित्यिक व परिसरातील स्नेहीजनां तर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या