नायगाव तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर करा.- प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगांव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये युवक काँग्रेसचे विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
नायगाव तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून असमाधानकारक पावसामुळे हातास आलेली खरीप पिके वाळून जात आहेत. आधीच मागच्या महिन्यांमध्ये नायगाव मतदारसंघात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आणि नंतर जवळ जवळ एक महिन्यापासून पावसाने अचानक दडी मारल्यामुळे उरली सूरली हातास आलेली सोयाबीन सारखी पिके फुलोऱ्यात येऊन सुकायला लागली आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत निसर्गाच्या दोन्ही बाजूमुळे वाढ झाली.
शेतकरी,कामगार,मजूरदार यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे त्यांचा शेती व्यवसाय आणि या शेती व्यवसायावर त्यांचे जीवन अवलंबून असतं आणि याच शेतीवर निसर्गाने घाला घातला त्यामुळे पिकासोबतच जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
त्यामुळे नायगाव विधानसभा युवक काँग्रेसच्या सर्व टीमच्या वतीने प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात आज नायगाव च्या तहसीलदार श्रीमती भगत मॅडम यांच्याकडे निवेदन दिले.
 झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला झोपेतुन जागे करा आणि खरीप पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान रुपी मदत द्यावी असे निवेदन शासन दरबारी दरबारी सादर केले. त्यासोबतच बारूळ कॅनॉलच्या माध्यमातून जनावराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्यासाठी कॅनल द्वारे पाणी सोडावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी नारायण पाटील जाधव (मा. नगराध्यक्ष प्रतिनिधी),पांडुरंग पाटील चव्हाण (शहरअध्यक्ष काँ.क.नायगाव) माणिक पाटील चव्हाण (युवक काँग्रेस ता. अध्यक्ष नायगाव), संजय पाटील चव्हाण (नगरसेवक प्रतिनिधी) साईनाथ चन्नवार (ओबीसी शहराध्यक्ष)स्वप्नील पाटील जाधव (एन.एस.यू.ता. अध्यक्ष) गजानन पाटील कल्याण (नगराध्यक्ष प्रतिनिधी) श्रीनिवास पाटील शिंदे (मा. नगरसेवक),संजय पाटील चोंडे (ता. अध्यक्ष ओबीसी सेल)मनोहर जोगेवार (सरपंच प्रतिनिधी घुंगराळा),हनुमंतराव पाटील सुजलेगावकर (मा.चेअरमन), लक्ष्मणराव कासराळे (सो.मी. वि.अध्यक्ष) रावसाहेब पाटील शिंदे बापूराव पाटील,सुनील सोनकांबळे(नगरसेवक),गोविंद मोरे, भगवानराव सुगावे ,माधवराव सुगावे, वेंकटराव ढगे, कैलास पाटील ,शिवाजी पा.शिंदे ,बाबासाहेब शिंदे,सुरेश जाधव,बालाजी शिंदे वअनेक शेतकरी बांधव व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या