नायगाव तालुक्यातील दुगाव व हुस्सा येथे अतिवृष्टीमुळे शेतीचे अति नुकसान !

तात्काळ पंचनामे करून अनुदान द्या – सुनील पाटील शिंदे दुगावकर !

नायगाव तालुक्यात व तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे.

तालुक्यातील दुगाव व हुस्सा गावात व परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेल्या उडीद, सोयाबीन, कापूस, तूर पिकाची मोठी हानी झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांची उडिद काढणी करून जमा करून ठेवलेले होते, पावसात काहींचे भिजून गेले तर काही चे वाहून गेले. गावच्या चहुबाजूंनी असलेले सर्व ओहोळ ओवरफ्लो होवून ओहळातिल पाणी सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात जावून परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. 
शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची नितांत गरज आहे. यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळवून द्यावेत अशी मागणी या गावातील शेतकरी वर्गातून होत आहे.

                               [ सुनिल पाटील शिंदे दुगावकर ]
                www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या