शेकापुर येथील दुर्गादेवीचे डि.जे. व गुलाल मुक्त शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन !

[ प्रतिनिधी – भास्कर कदम ]
पाताळगंगा गावाच्या पाठोपाठ, कंधार तालुक्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे शेकापुर येथील नवदुर्गा मित्र मंडळ बारामती नगर शेकापुर येथील दुर्गादेवीचे विसर्जन डि.जे. मुक्त व गुलाल मुक्त शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

नवदुर्गा मित्र मंडळ बारामती नगर शेकापुर चे अध्यक्ष गंगाधर भुस्कटे, उपाध्यक्ष सुनील भुस्कटे, व सचिव गजानन निल्लेवाड यांनी अथक परिश्रम घेऊन नवरात्र उत्सवात दरदिवशी विविध प्रकारचे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. व रविवार रोजी संपूर्ण गावाला चुलबंद निमंत्रण देऊन जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 मिरवणुकीत लहान लहान मुलींनी पुष्पवृष्टी करत, महिलांनी डोक्यावर कळस घेऊन व श्री संत ज्ञानेश्वर संगीत भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात टाळ मृदंगाचा ताल धरून नाचत वाजत – गाजत गावकऱ्यांच्या उपस्थित मिरवणूक पार पडली.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या