कुंडलवाडीत दुर्गा महोत्सवात भव्य महाप्रसाद संपन्न !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे l
          येथील वंजारगल्लीतील श्री भगवती दुर्गा महोत्सव आणि श्री भक्ती दुर्गा महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री सुगत नंदूरकर यांच्या वतीने भव्य महाप्रसादा चे आयोजन करण्यात आले होते व काल दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता संपन्न झाला आहे.
          प्रारंभी श्री सुगत नंदूरकर यांच्या हस्ते वंजार गल्ली या दोन्ही दुर्गा चे आरती करण्यात आली यावेळी कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पत्रकार सुगत नंदूरकर, भक्ती दुर्गा मंगळाचे अध्यक्ष बंटी साठे, व श्री भगवती दुर्गा मंगळाचे अध्यक्ष कैलाश माहेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे,अमरनाथ कांबळे,रुपेश साठे, शिवमणी नागूलवार, लखन नागूलवार, उद्योगपती श्री कैलाश माहेवार,भीम पोतनकर, माजी नगरसेवक राजू पोतनकर, गंगाप्रसाद गंगोने, सोने चांदी व्यापारी यशोदीप मुनगीलवार सेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक शंकर वारेवार, सोसायटी चे संचालक गंगोने, सहशिक्षक बालाजी गंगोने सर यांची उपस्थितीत होती.
यावेळी वंजारगल्ली, पोचम्मा गल्ली, नई आबादी, आंबेडकर नगर, साठे नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व या कार्यक्रमाच्या महाप्रसादा चे लाभ घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या