एकता दुर्गा महोत्सवाच्या वतीने ज्युनिअर सिनेकलाकारांचा ऑर्केस्ट्रा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
येथील एकता दुर्गा महोत्सव मंडळाच्या वतीने आज दिनांक 1 ऑक्टोंबर2022 शनिवार रोजी ज्युनिअर फिल्म स्टार च्या बहारदार कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात जूनियर सलमान खान जूनियर जॉनी लिव्हर जूनियर तेंडुलकर दिपाली तेंडुलकर यांची हजेरी लागणार आहे.
नायगाव येथील दरवर्षीप्रमाणे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मित्र मंडळाच्या वतीने पासून नायगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये एकता दुर्गादेवीची स्थापना भव्य दिव्य सभा मंडप, विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येते, गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आले होते.
यावर्षी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या पुढाकाराने मित्रमंडळ कार्यकर्त्याने उत्साहात प्रश्नमंजुषा, डान्स स्पर्धा, छोटा गट व मोठा गट समूह नृत्य गीते, रांगोळी स्पर्धा, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिला पुरुष मुलांनी हजेरी लावले होते तसेच दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 शनिवार रोजी जूनियर सीने कलाकारांचे म्युझिकल आर्केस्ट्राचे भव्य आयोजन करण्यात आले.
असून नायगाव येथील भूमी पुत्र रामेश्वर भालेराव तथा ज्युनिअर जॉनी लिव्हर याने पूर्ण महाराष्ट्र सह देशा बाहेर सुद्धा आपले नाव रसिकांच्या हृदयात कोरले आहे या जुनियर जॉनी लिव्हर सोबत सलमान खान जूनियर सचिन तेंडुलकर, दिपाली तेंडुलकर आदी सिने कलाकारांच्या जुनियर फिल्म स्टार कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा नायगाव येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा रसिक प्रेमी व नागरिकांनी असे आव्हान माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील चव्हाण पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या