उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांची स्वराज गणेश मंडळाला भेट I 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी मा.विक्रांत गायकवाड यांनी शहरात श्रीची विसर्जन करण्यासाठी तलावाचे पाहणी करण्यासाठी आलेले असताना कुंडलवाडी येथील गणेश मंडळाला भेट दिली.
गावातील सुप्रसिद्ध स्वराज गणेश मंडळ वंजार गल्ली येथे आले असताना येथील पत्रकार सुगत नंदूरकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे शाल व श्रीफल देऊन सत्कार केले व मंडळाचे अध्यक्ष राजू माहेवार यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांचे सत्कार केले. यावेळेस विक्रांत गायकवाड यांनी गणेश पूजन करून सर्वाना मार्गदर्शन केले.
या वेळेस स्वराज गणेश मंडळाचे अध्यक्ष राजू माहेवार, उपाध्यक्ष प्रफुल्ल खांडरे, सचिव बंटी साठे,कोषाध्यक्ष महेश कापकर, साईनाथ भोरे, रामनाथ करपे, शिवा खांडरे, शिवा गंगोने, पोतन्ना करपे, निखिल करपे, विनोद भास्कर, देविदास भोरे, श्याम खांडरे, शिवा धात्रक, लक्ष्मण नवाथे, शेखर खांडरे, बालाजी खांडरे, सुनील भास्कर,पोलीस कॉन्स्टेबल बेग, पोलीस नाईक, पत्रकार सुगत नंदूरकर,मुकेश जोशी आदिसह स्वराज गणेश मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या