व्हि.पी.के पतसंस्थेच्या वतीने अर्थिक मदत.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
उमरी तालुक्यातील नागठाणा बु येथील यूवक गिरिष नारायण पांडे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे समजताच व्हिपीके पतसंस्थेचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांत्वनपर भेट दिली.
 सविस्तर माहिती अशी की, आपल्या घरावरील पत्रे पावसामुळे गळत असल्याने प्लास्टिकने ती पत्रे झाकण्यासाठी भर पावसात पत्रावर गेलेल्या गिरीष पांडे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उमरी तालुक्यातील नागठाणा येथे घडली आहे. या घटनेची माहिती अशी की, बारावी वर्गात शिकणारा गिरीश नारायण पांडे १७ हा मुलगा मंगळवारी सायंकाळी आपल्या घरावरील पत्रे पावसामुळे गळत असल्याने गळक्या पत्रावर प्लास्टिक टाकण्यासाठी भर पावसात पत्रावर गेला.
पत्रावर पाय ठेवताच त्याला विजेचा धक्का बसल्याने तो पञावरच कोसळला. त्यातच नातेवाईक आणि मित्रांनी घराचा वीज पुरवठा बंद केला आणि पत्रावर जाऊन गिरीशला खाली आणले. परंतू तो मृत्यू पावला अशी माहिती कळताच आज नागठाणा ता.उमरी येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांत्वन पर भेट देवून आर्थिक मदत केली यावेळी उपस्थित अनिल वडजे नागठाणेकर, बाबासाहेब पाटील, जेष्ठ मार्गदर्शक बालासाहेब पांडे नागठाणा गावातील ग्रामस्थ, आदिजन उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या