संपादक आणि पत्रकार सेवा संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी नागोराव लोलापोड तर सचीवपदी शिवमणी नागुलवार यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
पत्रकार बांधवांच्या न्याय, हक्कासाठी लढणारे महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई येथील संघटनेचे बिलोली तालुका अध्यक्षपदी निर्भीड पत्रकार नागोराव लोलापोड तर तालुका सचिवपदी शिवमणी नागुलवार यांची झाल्याचे संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मनोज बुंदेले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे घोषीत केले आहे.
या विषयी सविस्तर वृत्तांत असा की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, आर्थिक, शासकीय,राजकीय दृष्ट्या अन्याय ग्रस्त पत्रकार बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी स्वाभिमानी बाणा असलेले संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई येथील संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष पदी बिलोली तालुक्यांतील मौजे कुंडलवाडी येथील निर्भीड पत्रकार नागोराव लोलापोड यांची तर सामाजिक सेवा धर्म कार्यांत नेहमी अग्रस्थानी राहणारे पत्रकार शिवमणी नागुलवार यांची बिलोली तालुका सचीवपदी निवड झाली आहे.
दिनांक २३नोव्हेबर२०११रोजी महा-२७३४ नोंदणीकृत संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे आहेत.संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक विष्णुपुरी एक्स्प्रेस चे मुख्य संपादक मनोज बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच बिलोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित एका बैठकीत बिलोली तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे.
सदरिल बैठकीत संपादक आणि पत्रकार सेवा संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी नागोराव लोलापोड, कार्याध्यक्ष इरेश मोहनराव माचलोड,सचिवपदी शिवमणी नागुलवार, उपाध्यक्ष दिगांबर लाडे,सहसचीवपदी ‌संतोष मेहरकर आदि जनांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आले.निवड झालेल्या पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण आणि आपली संघटना नेहमी अग्रेसर राहिल असे प्रतिपादन संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मनोज बुंदेले यांनी केले आहे. निवड झालेल्या पत्रकार बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती पत्र, परिवहन विभाग अंतर्गत प्रवासात अर्धे तिकीट, मोफत वैद्यकीय सुविधा आदि बाबींची उपलब्धता करून देण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या पत्रकार बांधवांचे पुढील यशस्वी कार्यासाठी शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून जिल्हा उपाध्यक्ष मनोज बुंदेले यांनी सत्कार करुन समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यक्षम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.निवड झालेल्या सर्व पत्रकार बांधवांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, कुंडलवाडी येथील माजी उपनगराध्यक्ष डॉ.कुडमुलवार, बिलोली नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, बजरंग दलाचे नांदेड जिल्हा संयोजक गजानन दामोदरजी पांचाळ‌ आदि जनांनी अभिनंदन करुन यशस्वी सामाजिक कार्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या