प्राथमिक शाळा खरसई येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत आराखड्यातील सुरू तपासणी !
[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरसई येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत आराखड्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी व उर्वरित कामे लोकसभागातून नियोजन करण्यासाठी जिल्हा समन्वयक श्री गजभिये सर व गट शिक्षणाधिकारी श्री कदम सर यांनी शाळेला भेट दिली व मार्गदर्शन केले.
आज शाळेमध्ये लोकसभागातून शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामकोष मधून शाळा रंगरंगोटी करण्यात येत आहे. तसेच शाळा दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी नागरीक व पालकांनी खूप सहकार्य केले. श्री गजभिये सरांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
उपस्थिती जिल्हा समन्वयक श्री गजभिये सर,गट शिक्षणाधिकारी श्री कदम सर, विस्तार अधिकारी श्री ठाकूर सर, SMC अध्यक्ष श्री निलेश मांदाडकर, VSTF तालुका समन्वयक श्री.सचिन निकम, मुख्याध्यापक श्री राठोड सर, शिक्षक, पालक इत्यादी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून।