शिक्षण परीषद २०२१ ठाणे येथिल राम गणेश गडकरी रंगयतन येथे संपन्न !

[ अलिबाग प्रतिनिधी :-अभिप्राव पाटील ]
शिक्षण हक्क परिषद २०२१ आंतर भारती पुणे शाखा आणि ग्राममंगल यांच्या संयुक्त विद्यमानाने १९/१२/२०२१ रोजी पार पडली. यावेळी शैक्षणिक परिसंवाद – या सत्राचे सूत्रसंचालन – डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी केल तर अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे होते.

(१) सुषमा पाध्ये – बालशिक्षण
(२) सूर्यकांत कुलकर्णी – शालेय शिक्षण 
(३) दिपक शिकारपूर – उच्च शिक्षण आणि डिजिटल
(४) डॉ. हेमचंद्र प्रधान – वैज्ञानिक दृष्टीकोन
वरील सर्वां तज्ञानी भविष्यातल्या शिक्षण पद्धती विषयी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले. यावेळी शिक्षण तज्ञ रमेश पांनसे यांचा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ काकोडकर हजर होते. जेष्ठ शिक्षण तज्ञ मा.श्री.रमेश पानसे सर यांचा सत्कार आंतर भारती पुणे टीमच्या वतीने सन्मानपत्र व नुकताच ८० वर्ष पुर्ण झाली म्हणून ८० पुस्तक भेट देण्यात आली. 

उपस्थित विचारमंचावर नामदार उदयजी सामंत साहेब, ग्राममंगल चे विश्वस्त मा.अभिजित पानसे, साहित्यिक व माजी सनदी अधिकारी मा.लक्ष्मीकांत देशमुख व आंतर भारती संस्थेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष डॉ.डी.एस.कोरे, मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णु पाटील. व इतर मान्यवर उपस्थित होते. मा.श्री.रमेश पानसे सर यांनी आपले मनगोत व्यक्त करतांना अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि विचार मांडले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या