शिक्षकांनी विध्यार्थ्यांतील सुप्त कलागुण ओळखून मार्गदर्शन करावे – शिक्षणाधिकारी दिग्रसकर

[ प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली येथील आंतर भारती शिक्षण संस्था ही तालुक्यातील एक नावलौकिक असलेली शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतून अनेक आदर्श विद्यार्थी निर्माण झाले आहेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यातील कलागुण जोपासावे तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात केले आहे….

बिलोली येथील आंतरभारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या आंतरभारती माध्यमिक विद्यालय बिलोली, विजय पटने मेमोरियल स्कूल बिलोली, जयराम अंबेकर विद्यालय अर्जापूर,साने गुरुजी विद्यामंदिर देगाव, या शाळेतील इयत्ता दहावीच्या गुणवंत सत्काराचा कार्यक्रम दिनांक 23 रोजी साने गुरुजी प्राथमिक विद्यालय बिलोली येथे आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे संबोधले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनातच कष्ट करण्याची तयारी ठेवावी जो विद्यार्थी कष्ट करतो त्याला यश प्राप्त होते, सर्व विद्यार्थी गुणवंत आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला गुण जोपासण्याचे काम करावे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्यावे,विशेषतः माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आवडीचा कल लक्षात घेऊन योग्य ते मार्गदर्शन करुन एक आदर्श पिढी निर्माण करावे.आंतर भारती शिक्षण संस्था ही तालुक्यातील एक आदर्श शिक्षण संस्था असून या संस्थेतून अनेक आदर्श विद्यार्थी घडले आहेत असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष गंगाधररावजी पटणे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माजी नगराध्यक्ष यादव तुडमे,विजय कुंचनवार,राजेश गंदीगुडे,संस्थेचे उपाध्यक्ष नंदाबाई पटणे,सचिव चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका जयमाला पटणे, हावगीरराव गोपछडे, आदीसह सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या