जि.प.प्रा शाळा चिवळी येथे जि.प नांदेड चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.प्रशांत दिग्रसकर यांची भेट !

[ नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी – गणेश कंदुरके ]

दिनाक 11 नोव्हेंबर रोजी जि.प.प्रा शाळा चिवळी येथे जि.प नांदेड चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे तसेच मुखेड प.स चे गट शिक्षणाधिकारी मा व्यंकटराव माकणे, केंद्रप्रमुख शिवाजीराव कराळेसर, विषयतज्ञ विलास जाधव यांनी भेट दिली. यावेळी NAS सर्वेक्षण चाचणी घेताना इयत्ता 3 री च्या मुलांची चाचणी क्र 4 सोडवताना 26 पैकी 25 विध्यार्थी उपस्थित होते.

हे पाहून व सुंदर शाळा व सुट्टीत 4 चाचण्या घेतल्याबद्दल मा.शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक सय्यद अली व सौ.वर्षा पाटील यांचा शाल देऊन सत्कार केला व अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. शाळेच्या वतीने मान्यवरांचे सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

www.massmaharashtra.com

(आमच्या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा.Click photo)

ताज्या बातम्या