शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे, गटशिक्षणाधिकारी मोहन कदम यांच्या नायगाव तालुक्यात संयुक्त शाळा भेटी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ.सविता बिरगे आणि नायगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहन कदम यांनी नायगाव तालुक्यातील शाळांना अचानक भेटी देऊन शाळांची पाहणी केली.
तलबीड येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांकडून पाढे म्हणून घेतले, गणवेश, शालेय पोषण आहार, वृक्षारोपण, शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. रानसुगाव येथील शाळेला भेट देऊन सेतु अभ्यासक्रम, अकारिक मूल्यमापन, दैनंदिन नोंदी या विषयी माहिती घेतली.
जिल्हा परिषद कन्या शाळा नायगाव येथे भेट देऊन त्यानी प्रत्यक्ष वर्गाची पाहणी करून विद्यार्थ्यांना अक्षर वाचन, शब्दलेखन, वाक्य वाचन, उतारा ,पाढे, विज्ञानपेटी विषयी प्रश्न विचारले. अध्ययन स्तर निश्चिती संदर्भात माहिती घेऊन मल्टीस्किल व प्रयोगशाळेबाबत समाधान व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी मोहन कदम यांनी तालुक्यातील राबवल्या जाणा-या अनेक उपक्रमांची माहीती त्यांना दिली. शाळापूर्व तयारी मेळावा, नुतन प्रवेश, गुणवत्ता वाढ, गोष्टीचा शनिवार, ग्रंथालय, बोलक्या भिंती याविषयीचा आढावा घेऊन त्यांनी नुकताच पदभार स्विकारून काम चांगले करत असल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी मोहन कदम यांचे कौतुक केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शिरसाठ, मुख्याध्यापक रेणगुंटवार,केंद्रप्रमुख शिवराज साधू, व्यंकट गाजलवाड उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या