एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे शिक्षण दिल्यामुळे आज एवढे मोठे वैभव प्राप्त झाले. – माजी आ.वसंतराव चव्हाण

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
       साठ वर्षांपूर्वी ठराविक ठिकाणे सोडून जिल्ह्याशिवाय कुठेच शिक्षणाची व्यवस्था नव्हती यामुळे त्या काळात कै.अण्णांनी कठोर परिश्रम घेऊन नायगाव सारख्या ठिकाणी गोरगरिबांना शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शिक्षणाची व्यवस्था केली यामुळे संस्थेच्या वृक्षाचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले म्हणूनच आज एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे प्रतिपादन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण यांनी जनता हायस्कूल येथील आयोजित ३४ व्या वकृत्व स्पर्धेत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
      दि.२४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल (क.म.वि.) नायगाव च्या वतीने जिल्हास्तरीय कै.अमृतराव पाटील चव्हाण वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण हे होते तर उदघाटक म्हणून कुलगुरू उध्दवरावजी भोसले (स्वा.रा.ती.म.वि.नांदेड)हे होते तर व्यासपीठावर जेष्ठ संचालक केशवराव पाटील चव्हाण, हणमंतराव पाटील चव्हाण,माधवराव बेळगे,नगराध्यक्षा मिनाताई कल्याण,प्रा.रविंद्र पा.चव्हाण,माजी प्राचार्य अजनीकर सर, ह.स.खंडगावकर, गोविंदराव मेथे सर, प्राचार्य हरीबाबू सर, मुख्याध्याप गंगाधर चव्हाण सर, नारायण शिंदे, प्राचार्य के.जी.सुर्यवंशी, दत्ता पाटील होटाळकर, प्रल्हाद पाटील होटाळकर यासह आदींची उपस्थिती होती.
प्राचार्य के ‌जी.सुर्यवंशी सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची सविस्तर भुमिका मांडली यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उध्दवरावजी भोसले म्हणाले की,शिक्षण हे नौकरी मिळविण्याचे साधन नसून एक चांगला माणूस बनवण्याचे साधन आहे स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मागे राहू नये तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे असे ते म्हणाले तर अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना वसंतराव पाटील चव्हाण म्हणाले की, एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाची सर्व सोयी उपलब्ध करून चांगल्या दर्जाचे शिक्षण दिल्यामुळे आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत असे सांगून स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी,पालक व संस्थेचे सर्व शिक्षकवृंद,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम पाटील यांनी केले तर आभार पी.‌डी‌.जाधव सर यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या