रायगड जिल्हा परिषद शाळा आगरवाडा येथे आज दिनांक १६/०३/२०२२ रोजी सम्पन्न झाली सदर कार्यशाळेस वरवटने केंद्रातील ११ जिल्हा परिषद व २ माध्यमिक शाळेचे शिक्षक बंधु भगिनी आवर्जून उपस्थित होते.
आगरवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रमिला भोसले मॅडम, व उपशिक्षक श्री नितिन गर्जे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ वनिता नाक्ती व जेष्ठ सभासद श्री कानू नाक्ती व ग्रुपग्रामपंचायत वरवटने चे उपसरपंच श्री जनार्दन गानेकर यांनी उपस्थित केंद्रीय प्रमुख श्री.अरविंद मोरे व केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधुभगिनी यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
तसेच केंद्रातील साळवींडे शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश अकोलकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना रायगडचा शिक्षक रत्न पुरस्कार व बनोटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.तृप्ती सावंत याना सर फाउंडेशन यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिलाल्याबद्दल आगरवाडा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन आगरवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेत श्री दीपक सोनावले, सौ संगीता आंबेडकर, श्री गणेश अकोलकर, श्री.राजेश खटके, श्री अशोक सहाणे यांनी नेमून दिलेल्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले श्री अशोक सानप व श्री बालाजी राठोड, श्री. प्रकाश म्हात्रे सर इतर सर्वांनी चर्चेत सहभाग घेतला व मौलिक मार्गदर्शना नंतर शिक्षण परिषद कार्यशाळा सम्पन्न झाली. श्री.किरण पाटील सर यांनी उपस्थित मंडळींचे व आगरवाडा शाळेचे तसेच व्यवस्थापन समिती आगरवाडा व व्यवस्थापन करणाऱ्या माता भगिनी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy