संकुल सुजलेगाव ची शिक्षण परिषद संपन्न !

[ कुंटूर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील 2022 रोजी सुजलेगाव केंद्राची शिक्षण परिषद शांतिनिकेतन मा.विद्यालय कुंटूर येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र प्रमुख श्री हनवटे सर उपस्थित होते.आपल्या प्रास्ताविकात केंद्रप्रमुख श्री.हनवटे सर यांनी नविन शैक्षणिक घडामोडी व नवोपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्याव अध्ययन अध्यापन येणा-या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले.
सुलभक म्हणून पांचाळ सर,तळणे सर व भोसले सर यांनी कृतिशील अध्यापन,विद्याप्रवेश, निपुण भारत व FlN याविषयी माहिती दिली. गाडगेराव सर यांनी शब्दडोंगर हे कृतीयुक्त गित सादर केले.तर जळपतराव मॅडम यांनी विद्याप्रवेश कृतीपत्रिके प्रमाणे दिनदर्शिका तयार करून त्याचा विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी कसा उपयोग करावा या विषयी कृती सादर केली.
सौ.लव्हेकर मॅडम यानी विद्यार्थ्यांस अवघड वाटणारा भागाकार कृतीतुन सोपा करून कसा शिकवावा हा आदर्श पाठ घेतला. आजच्या शिक्षणपरिषदेत अमृतमहोत्सव निमित्ताने रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत तसेच विज्ञान प्रदर्शनात तालुक्यांतून प्रथम आलेल्या कुंटूर व सुजलेगाव येथील विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख हनवटे सर यांचे कडून बक्षीस देऊन गौरव केला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आनंददायी पद्धतीने ही परिषद संपन्न झाली.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक गादेवार सर, गंगाधर मावले सर सुरेश बा-हाळे सर सर्व पदोन्नत मुख्याध्यापक यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री पांडे सर यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या