संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.

[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
वारकरी चळवळीचे महानायक, पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा धिक्कार करणारे,बाराव्या शतकातील पहिले संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील मौजे सिरजखोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप करण्यात आले. 
      एकंदरीत आपल्या कीर्तन अभंगांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी जनमानसाला दिला. परिवर्तनवादी विचारसरणी त्यांनी नेहमी जपली होती. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. व या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिरजखोड येथे 20 आगष्ट रोजी समस्त नाभिक समाज बांधवाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही,पेन वाटप करण्यात आले आहे. 
  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर,सुलतान सर, व इतर शिक्षक, शिक्षिका तसेच नाभिक समाजाचे विठ्ठल सज्जन, लक्ष्मण सज्जन, शंकर सज्जन,परसराम सज्जन,संतोष गायकवाड, गणेश जुनीकर,सज्जन गोविंद, सज्जन नामदेव दत्ताहरी सज्जन, गजानन सज्जन, पांडुरंग सज्जन, पोतना सज्जन, संतोष सज्जन, विशाल सज्जन दत्ता पवार, दत्तात्रय सज्जन,मोहन सज्जन सय्यद इम्रान, अन्सर, दाऊद, दिलू , बाहोदिन आदी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या