भापट येथे साने गुरुजी बालभवन वाचनालय मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप !

  • दुर्गम भागातील वाचनालयाचे कार्य कौतुकास्पद – पुरूषोत्तम मुळे !
[ म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
म्हसळा तालुक्यातील अती दुर्गम भागातील भापट या गावी साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयात ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या वाटप करण्यात आल्या आणि १० वी, १२ वी, पदवीधर विद्यार्थ्यांना श्रमजीवी संस्थेच्या वतीने अभिनंदनपर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी श्रमजीवी परिवार संस्थेचे प्रमुख हरेशजी कावणकर, सल्लागार पुरूषोत्तम मुळे, श्रमजीवी चे सहसंपादक मिलिंद खार पाटिल, रयतेचा कैवारी कार्यकारी संपादक मिठ्ठूजी आंधळे , पाष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख नरेश सावंत सर, जेष्ठ समाजसेवक – रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शंकरराव भिकु बेटकर, श्रमजीवी सहकारी पतसंस्था संचालक महेश जावळे, श्रमजीवी सदस्य अनंत झाटे, मनीष गुरव , शिक्षणप्रेमी सन्मेश सोनावणे, पाष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख नरेश सावंत सर, ग्रामसेवक योगेश पाटील, चोगले, कोळवट पोस्टाच्या पोष्ट मास्तर रूतीका काकडे मॅडम, शाहिर -वनविभागाचे अधिकारी भिमराव सुर्यतळ,श्रमजीवी पूरस्कार प्राप्त जेष्ठ तमासगीर, समाजसेवक नथुराम धाकु घडशी, भापट गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे, लक्ष्मण मोहिते, सत्तार नजिर ,प्रमोद बेटकर , अनंत अलिम, कोलवट गावचे सुनिल येलवे , न्यु अनंत वाडी चे गाव अध्यक्ष भिवा खोपरे, उपक्रमशील शिक्षक रूपेश गमरे सर, भापट शाळेचे मुख्याध्यापक शेख सर वाचनालय संयोजक जयसिंग बेटकर सर , ग्राम पंचायत सदस्या वंदना बबन मोहिते, महिला प्रतिनिधी कोमल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सुरुवात करण्यात आली. शाहिर भिमरावजी सुर्यतळ यांच्या वाणीतून पहाडी आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत झाले, उपस्थित मान्यवरांचे शाळ , पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संयोजक जयसिंग बेटकर सर यांनी केले. उपस्थित मान्यवर यांच्या वतीने केंद्र प्रमुख नरेश सावंत सर यांनी शैक्षणिक विषयाशी निगडीत वाचनालय या बाबींशी सांगड घालून मार्गदर्शन केले. श्रमजीवी संस्थेचे प्रमुख हरेशजी कावणकर यांनी सांगितले की, आज आम्ही साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयाला भेट दिली असता खरंच एवढ्या दुर्गम भागात आपण एवढं वाचनालय सुरू करून विविध उपक्रम, कार्यक्रम घेऊन यशस्वीपणे पार पडत आहात या कार्याबद्दल कौतुक केले. पुढील वर्षी आणखी योगदान देऊन नक्कीच श्रमजीवी परिवार या वाचनालयाला आणि या भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य प्रेरणा देईल.
रयतेचा कैवारी कार्यकारी संपादक यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड, रूची निर्माण होईल असे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन या साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट ची वाटचाल आहे अशा शुभेच्छा दिल्या, श्रमजीवी संस्थेचे सल्लागार पुरूषोत्तम मुळे साहेब यांनी माजी अर्थमंत्री सी.डी.देशमुख, चिंतामणी चिचकर, डॉ तात्यासाहेब लहाने तसेच एमपीएससी मध्ये कौशल्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे उदाहरणे देत उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी या भागातील सांगवड, ठाकरोळी, कोकबल वाडी, कोकबल, न्यू अनंत वाडी, भापट, रातीवणे, घाणेरी कोंड, कोळवट , ताम्हणे करंबे, चिरगाव या गावातील दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थ्यांना श्रमजीवी संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्रक अभिनंदनपर देऊन गौरविण्यात आले व एकुण ११० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयसिंग बेटकर सर यांनी केले, सुत्रसंचलन रूपेश गमरे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन रूतीका काकडे मॅडम यांनी केले.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या