एकदंत गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी देवीदास तोटरे तर उपाध्यक्ष पदी सचिन सुर्यवंशी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील नरसी येथील एकदंत गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी देवीदास जेजेराव तोटरे यांची तर उपाध्यक्ष पदी सचिन व्यंकटराव सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
पञकार गोविंद नरसीकर, देवीदास सुर्यवंशी, शंकर टोकलवाड, चंद्रकांत सुर्यवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ ऑगस्ट रोजी सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे सणासुदींवर निर्बंध आले होते. परंतु यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत.
एकदंत गणेश मंडळाचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे– सचिव माधव सुर्यवंशी, सहसचिव– सचिन पललवाड, कोषाध्यक्ष– राजेश गायकवाड, सदस्य– अणिल सुर्यवंशी, सुर्यकांत सुर्यवंशी, सुमित आढाव, साईनाथ सूर्यवंशी, पांडुरंग निलेवार, राहुल भेदे, रोहित सूर्यवंशी, राम पलवाड, श्याम पलवाड निवृत्ती सूर्यवंशी, अनिल भेदे, गजानन सूर्यवंशी, सुनील भेदे, साहेबराव भेदे, अंतेश्वर सूर्यवंशी, सुधाकर सूर्यवंशी, यशपाल सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या