16 नांदेड लोकसभा मतदारसंघ 89 नायगाव विधानसभा मतदारसंघातील 85 पेक्षा जास्त वय असलेल्या दिव्यांग मतदारांची शंभर टक्के मतदान प्रक्रिया नुकतीच पडली असून नायगाव मतदार संघातील 111 मतदार त्यापैकी 107 गृह मतदारांनी आपला हक्क बजावला यामध्ये 85 पेक्षा जास्त असलेले 87 मतदारां पैकी 84 मतदार तसेच दिव्यांग मतदार 24 पैकी 23 मतदाराने आपला गृह मतदानाचा हक्क शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हक्क बजावला यामध्ये गृहमतदान घेण्यासाठी शासनाच्या वतीने एकूण दहा पथक नेमण्यात आले होते.
त्यानुसार पारदर्शक गृहमतदान घेण्यात आले असून यासाठी उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा मतदारसंघ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदान कामी श्रीमती गंधाली पवार अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत नायगाव, धम्मप्रिय गायकवाड सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार नायगाव,श्रीमती सुरेखा स्वामी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धर्माबाद , काशिनाथ देशटवाड व श्री सतीश कुलकर्णी नायब तहसीलदार नायगाव व अशोक भालेराव महसूल सहाय्यक यासह प्रशासकीय यंत्रणाने सहकार्य केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy