कावलगुडा बु. येथील सोसायटी बिनविरोध !

[ नांदेड जिल्हा प्रतिनधी – आनंद सुर्यवंशी ]
माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनात कावलगुडा बु येथील सोसायटी बिनविरोध झाली. चेअरमन म्हणून सर्वानुमते शेषराव पाटील ताटे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण व युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी चेअरमन व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गावामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले याबद्दल वसंतराव चव्हाण साहेबांनी गावकऱ्यांचे मनस्वी स्वागत केले.  कावलगुडा हे गाव नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिलेला आहे. सेवा सहकारी सोसायटीमध्ये सदस्य म्हणून बाबुराव पाटील ताटे, प्रकाश पाटील ताटे, संजय पाटील दुगाडे, दिगंबर पाटील दुगाडे, शिवाजी पाटील दुगाडे, महादेव मेतकुलवार, रोडेकर पांडुरंग व महिला सदस्य म्हणून अंजनाबाई भुत्ते व शोभाबाई जाधव यांची सर्वानुमते निवड झाली. काँग्रेस पक्षाचा विजय झाला.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या