रब्बी हंगामात शेतकऱ्यांची होण्या आधी चांदी, विज वितरण कंपनी करतेय त्यांची तुंबी !
[विशेष प्रतिनिधी कंधार- भास्कर कदम]
विज-वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, तसेच अनेक गावातील पाणीपूरवठा करणाऱ्या विहीरीची लाईट कट केल्या जात आहे. त्या साठी आज दि. १५ डिसेंबर बुधवार रोजी मा. तहसीलदार कंधार यांना निवेदन देऊन, लगेच उपअभीयंता विजवितरण कंपनी कंधार यांना वंचित बहुजन आघाडी नांदेड अध्यक्ष मा. शिवाभाऊ नरंगले यांच्या उपस्थितीत आज कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे यांच्यासह कंधार तालुक्यातील शेतकरी व वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी देखील, विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बडगा उचलायच काम करत असतील तर, आम्ही रुमणं वापरायचं काम आम्ही करू अशी भावना व्यक्त केली. पुढे वंचित बहुजन आघाडी चे नांदेड जिल्हाअध्यक्ष, शिवा भाऊ नरंगले यांनी देखील येत्या सोमवार पर्यंत शेतकऱ्यांची विज तोडणी बंद केले नाही, तर आम्ही वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन विज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे, महासचिव प्रेमानंद गायकवाड, युवा नेते शंकर पाटील घोरबांड’ खंडोजी अकोले’ मोसिन बागवान, बबन जोंधळे प्रविंणसिंह कच्छवा,’ सुमित पवार ‘बालाजी सैराते भास्कर कदम विहान पा कदम’ रंजीत कसबे, अहमद पठाण ‘संभाजी कांबळे’ निखिल सोनसळे’ सूर्यनिकीत, नितीन सुर्ये, बालाजी गायकवाड, यासह अनेक शेतकरी बांधवांच्या व शेतकरी पुत्रांच्या स्वाक्षर्या आहेत.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून