प्रभाग पाच मधील खंडीत पाणी पुरवठा सुरळीत मोहम्मद अफजल यांचा पाठपुराव्यास यश

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी नगर परिषद अंतर्गत गतीमान प्रशासन मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी वर्ग राबत असल्यांचे चित्र दिसायला मिळत आहे.प्रभाग पाच गौस सेठ यांच्या घराजवळील नादुरूस्त बोर फक्त दोन दिवसात दुरूस्त करून खंडीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आले.
शहरातील प्रभाग पाच मधील बोर शुक्रवार दि.4 ऑगस्ट रोजी नादुरूस्त झाले होते.याबाबत पत्रकार मोहम्मद अफजल यांना माहीती मिळताच दि.5 शनीवार रोजी माहीती कार्यालय अधीक्षक सुभाष निरावार,सुपरवायझर धोडीबा वाघमारे यांना देण्यात आले.
मेकॅनीक शेख याबा व त्यांचे सहकारी बोर दुरूस्तीसाठी शनीवार रोजी सायंकाळपर्यंत काढले.
बोर दुरूस्त करून गल्लीतील खंडीत पाणी पुरवठा दि.7 ऑगस्ट सोमवार रोजी पत्रकार मोहम्मद अफजल यांच्या पाठपुराव्यामुळे फक्त दोन दिवसात प्रभाग पाच शतरंजी गल्ली येथील खंडीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आली.यामुळे कुंडलवाडी नगर परिषद गतीमान प्रशासनाची प्रचिती दिसायला मिळाली.
प्रभागातील नागरीक मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान, अधिक्षक सुभाष निरावार, सुपरवायझर धोडीबा वाघमारे, मेकॅनीक शेख याबा, कर्मचारी विजय वाघमारे,राम वाघमारे,नारायन येपुरवार यांचे आभार व्यक्त करीत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या