शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडणी तात्काळ बंद करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडणी तात्काळ बंद करण्याच्या अनुषंगाने भाजपा शहर शाखेच्या वतीने तर कनिष्ठ अभियंता विद्युत वितरण कंपनी कार्यालय कुंडलवाडी यांना निवेदन देण्यात आले…
           सदरील निवेदनात असे नमुद करण्यात आले की, यंदा पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक परिस्थितीने कमकुवत झाला आहे.सध्या शेतकऱ्याना रब्बी, तूर, हरभरा, ज्वारी, पिकास पाणी देण्याचा मौसम आहे. असे असले तरी वीज वितरण कार्यालयामार्फत शेतकऱ्यांवर दबाव टाकून वीज बिल वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे विज वितरण कर्मचाऱ्यांना सुचना देऊन शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ बंद करण्यात यावे,अन्यथा पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाऱ्याचे निवेदन देण्यात आले आहे.
           यावेळी माजी उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,जिल्हा महिला मोर्चाचे संगीताताई मेरगेवार, शहराध्यक्ष शेख जावेद, नगरसेवक शंकर गोनेलवार, पंढरी पुप्पलवार, गंगाप्रसाद गंगोणे, नगरसेवक प्रतिनिधी शेख वहाब, सायरेड्डी पुप्पलवार, संतोष पाटील शिवशट्टे, लक्ष्मण भंडारे, मोहम्मद अफजल, दत्तू कापकर, राजेश दुपतल्ले, हणमंलू कोणेरवार, प्रकाश मेरगेवार आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या