नायगाव तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा सुरळीत करा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांची अधीक्षक अभियंता यांच्याकडे मागणी !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
जिल्ह्यात व नायगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे तो वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांनी महावितरण चे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यात प्रामुख्याने नायगाव तालुक्यातील घुंगराळा, सावरखेड, रुई, वंजारवाडी, कृष्णूर या गावांसह विविध गावात वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या रब्बी पिकांचा हंगाम चालू असून पिकांना वीज पुरवठा नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत. तसेच अनेक गावांत वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.
अनेक गावांत सिंगल फेज व थ्री फेज डीपी नादुरुस्त व बंद पडलेले आहेत.अशा ठिकाणी डीपी दुरुस्ती व नवीन डीपी बसविण्यात यावेत. अशीही मागणी करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील घुंगराळा या गावात खंडोबा देवाची यात्रा गुरुवार पासून चालू होत आहे. या यात्रे दरम्यान पाच दिवस घुंगराळा गावात थ्री फेज लाईट पूर्ण वेळ चालू ठेवण्यात यावी ही मागणीही करण्यात आली यावर अधीक्षक अभियंता यांनी तत्वतः मान्यता दिली.
वीज बिल वसुलीचे काम जसे जोरदारपणे चालू आहे त्याप्रमाणे वीज वितरण कंपनीने नागरिकांना व शेतकऱ्यांना सुविधा देण्यात याव्यात अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल त्यामुळे वरील सर्व गोष्टी मार्गी लावून वीज पुरवठा सुरळीत करावा .व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याबाबत वीज वितरण कंपनीने काळजी घ्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी अधीक्षक अभियंता (महावितरण) यांच्याकडे केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अर्धापूर तालुकाध्यक्ष चंद्रकांत पा.टेकाळे, कुंटुरचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या