लोडशेडिंगच्या नावाखाली नागरिकांना नाहक त्रास ; ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रात्री अपरात्री कधीही बत्ती गुल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील 33 के व्ही विद्युत उपकेंद्रातून शहर व परिसरात विद्युत पुरवठा केला जातो पण गेल्या दोन तीन दिवसापासून शहर व परिसरात दिवसा व अपरात्री केव्हाही विद्युत बत्ती गुल होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे शहर व परिसरातील विद्यूत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी महावितरण विभागाकडे नागरिक करीत आहेत.
 कुंडलवाडी येथील 33 के व्ही उपकेंद्रच्या फीडरवर जवळपास शहर व परिसरातील 25 गावाचा समावेश असून या उपकेंद्र अंतर्गत दररोज विद्युत पुरवठा केला जातो,पण गेल्या तीन दिवसापासून दररोज दिवसा व रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.यात दिवस व रात्री 10 वाजताच्या नंतर कुठलेही वेळापत्रक महावितरण विभागाने जाहीर न करता मनात येईल तेव्हा विद्युत पुरवठा बंद करीत असल्यामुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे शहर व परिसरातील नागरिकांनी वेळेवर वीज बिल भरणा करुन ही वीज पुरवठा खंडित होत असेल तर याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.असे असले तरी ऐन उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून या उष्णतेच्या उकाड्यात नागरिकांची वाताहत होत आहे, यात महावितरण विभागाच्या बेजबाबदार पणामुळे रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केलामुळे नागरिकांत तीव्र संताप निर्माण होत आहे.
रात्रीला डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांसहित लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असला तरी रात्री बत्ती गुल होत असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडतांना दिसून येत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने दिवसभर लोडशेडिंग करावी पण, रात्री नको अशी मागणी आता समोर येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या