घुंगराळा येथे वीज समस्या मेळावा संपन्न – वसंत सुगावे पाटील यांच आयोजन!

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर होत नसल्याकारणाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी महावितरण चे नांदेड परिमंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. राख, देगलूर चे कार्यकारी अभियंता श्री.श्रवणकुमार साहेब, नायगाव चे उपकार्यकारी अभियंता श्री. दंडगव्हाल साहेब यांच्यासह सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंतानायगाव तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व कर्माचारी यांच्या उपस्थतीत वीज समस्या मेळाव्याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव पंचायत समितीचे माजी सदस्य परबतराव पा.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य सूर्याजी पा. चाडकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पा बेंद्रीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अनेक गावाचे नागरिक, सरपंच,यांनी वीज समस्येबद्दल आपआपल्या गावातील समस्या महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. अनेक गावांत डी.पी.नसणे, डी.पी ची नादुरुस्त असणे, पोल मोडलेले, वाकलेले असणे ,नवीन लाईन टाकणे याबाबत उपस्थित नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वीज पुरवठया बाबतच्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या.
वीज पुरवठा सुरुळीत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या कामांचा प्रश्न भेडसावत आहे याबाबतही उपस्थितांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वीज पुरवठा सुरुळीत नसल्यामुळे दळण दळण्यासाठी 5 ते 10 किमी अंतरावरील गावांत जाऊन दळण आणावे लागत आहे. अशा स्वरूपाच्या व्यथा या मेळाव्यात मांडण्यात आल्या. लेखी स्वरूपात देण्यात आल्या.
यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व शेतकरी, व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ही कामे मार्गी लावा असे आदेश दिले.
 खंडित होणारा वीज पुरवठा, नवीन डीपी बसवणे ही कामे तात्काळ करून वीज पुरवठा सुरुळीत करू असे आश्वासान महावितरण च्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना दिले.
या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक वसंत सुगावे पाटील यांनी केले.
यावेळी नायगाव तालुक्यातील ३० ते ४० गावांतील विजसमस्या ग्रस्त शेतकरी, लघुउद्योजक ,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वीज समस्या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल शेतकरी, व नायगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष आदी लोकप्रतिनिधींनी वसंत सुगावे पाटील यांचे आभार मानले.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजीराव मातावाड साहेब, नागोराव दंडेवाड साहेब, मुरहरी तुरटवाड, माधव पा. ढगे, श्यामराव यमलवाड, गोविंदराव पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा. ढगे, विठ्ठल बाष्टे, गंगाधर पांचाळ, चेअरमन नारायण पा. ढगे, नागेंद्र जक्केवाड, रामचंद्र ढगे, विलास ढगे, राजेश ढगे, गंगाधर ढगे, विशाल जाधव, योगेश ढगे, शंतनू ढगे, उमेश कदम, आदींनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या