आज लोह्यात एल्गार मेळाव्याचे आयोजन !

प्रमुख मार्गदर्शन ॲड. विनोद भैय्या पाटील
—————————————
विशेष प्रतिनिधी/ रियाज पठान

लोहा येथे दि.11 ऑक्टोबर 2020 रोजी मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात भव्य एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. विनोद भैय्या पाटील हे राहणार आहेत. लोहा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेआहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे. या स्थागिती वर चर्चा करण्यासाठी दि.11 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक बारा वाजता व्यंकटेश गार्डन लोहा येथे बैठकीला मराठा आरक्षण याचिकाकर्ते ॲड. विनोद भैया पाटील यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.
या भव्य एल्गार मेळाव्यास सकल मराठा समाजातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रातील तसेच सर्व युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज लोहा तालुक्याच्या वतीने करण्यात आलेले आहे.

ताज्या बातम्या