आजाद समाज पार्टीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा थडीसावळी येथे संपन्न !

आजाद समाज पार्टी सर्व निवडणुका ताकदीनिशी लढवणार- अरूणकुमार सुर्यवंशी 

बिलोली तालुक्यातील थडी सावळी या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाचे अरूणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांच्या उपस्थितीत व पक्षाचे नेते इंद्रजित डुमणे यांच्या नेतृत्वात १४ फेब्रुवारी २०२० रोजी आजाद समाज पार्टीत पक्षप्रवेश केला.

तरूणांच्या हातात सत्ता देऊन, संविधानाच रक्षण करण्यासाठी आजाद समाज पार्टी मैदानात उतरली असुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा ताकदीने पक्ष लढवणार असल्याचे भाषणात बोलताना पक्षाचे नेते अरूणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थडी सावळीचे नवनिर्वाचीत सरपंच गंगाधर अनपालवार होते.

या प्रवेश सोहळ्यास आजाद समाज पार्टी चे देगलुर चे नेते विकास नरबागे, नायगाव चे नेते कपिल डुमणे, पत्रकार धम्मानंद भेदेकर, पत्रकार शेषेराव गावंडे, प्रजासेना नायगाव तालुकाप्रमुख रवी कांबळे, पञकार गौतम वाघमारे, अजय वाघमारे कुंडलवाडी, बाळकिशन वीर, प्रशांत डुमणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन गंगाधर भंडारे यांनी केले तर सुञसंचन मोहन काळे यांनी केले.

यावेळी आजाद समाज पार्टीमध्ये माधव काळे,राजेश काळे,शिवात्मा भंडारे,सुनील काळे,योगेश कोकणे, गंगाधर भंडारे,सुदर्शन काळे,रमेश बोंमडे,नागनाथ वागमारे,इस्माईल शेख,बालाजी तुपसाखरे यांच्यासह
असंख्य युवकांनी पक्ष प्रवेश केला.

ताज्या बातम्या