उपक्रमशील शिक्षक राजू भद्रे !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या थँक्स टीचर या उपक्रमात मी निबंध स्पर्धेत भाग घेत असून, मी ‘उपक्रमशील शिक्षक’ हा विषय निवडलेला आहे. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक पदापासून देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करतो. एक साधा शिक्षक एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतो म्हणजे शिक्षकांची महतीच आहे. शिक्षक म्हणजे काय? शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कष्टाळू या त्रिसूत्रीने सम्पन्न असलेला व्यक्ती म्हणजे शिक्षक.
समाजामध्ये अनेक शिक्षक आहेत पण सदरील गुण दिसून येतीलच असे नाही. म्हणून शिक्षक नावाला असून चालत नाही तर त्याच्या हातात असलेल्या देशाच्या भविष्याची पिढी घवण्याचे सामर्थ्य असले पाहिजेत.
Change in behaviour means Education. म्हणून सर्वांगीण विकास घडवून आनणारे शिक्षक असावेत असे मला वाटते. सर्वांगीण विकास करायचं असेल तर शिक्षक उपक्रमशीलच असावा लावतो. खरच आजच्या परिस्थितीत covid 19 काळात शिक्षक उपक्रमशील असणे आवश्यक आहे. म्हणून माझे उपक्रमशील शिक्षक ‘ राजू गौतम भद्रे’ हे असून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी ता. नायगाव जि. नांदेड येथे 2016 पासून कार्यरत आहेत.
भद्रे सरांनी शाळेत रुजू झाल्यापासून शाळेचा चेहरा मोहरा बदलून गेला. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. शाळा स्वच्छ व सुंदर झालेली असून तांबकुमुक्त झालेली आहे. शाळेतील स्वछतागृह वापरात असावे यासाठी सरांचे कटाक्षाने लक्ष असते. सन 2018 – 19 मध्ये सरांनी शाळा डिजिटल केलेली असून ग्रामपंचाय कडून सॉफ्टवेअर सह प्रोजक्टर, संगणक व साऊंड स्पीकर उपलब्ध करून घेतले. बालभारती पुणे तर्फे शाळेची प्रगती पाहून 50 इंच ची इनबिल्ट स्क्रीन उपलब्ध करून देण्यात सरांचं मोलाचा वाटा आहे.
या सर्व डिजिटल च्या सुविधा सरांमुळे शाळेत उपलब्ध झालेल्या असून सुस्थितीत वापरात आहेत. याचे सर्व श्रेय भद्रे सरांना जाते.
खरचं सरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण लॉकडाऊन मध्ये शाळा बंद झाल्या शिक्षण थांबले पण सर थांबले नाहीत. 2019 मध्ये सरांनी आमच्यासाठी ‘ लॉकडाऊन मधील आपली करमणूक अन विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा खुराक’ हा उपक्रम राबविला. यामध्ये सरांनी ऑनलाइन इंग्रजी व विज्ञान विषयाचे प्रत्येकी 15 आणि 20 प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. अश्याप्रकारे आमच्या शाळेचे मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने करून सर्वांना दिशा दिली.
आज 2020 मध्ये शाळा चालू झाल्या नाहीत म्हणून सरांनी ऑनलाइन क्लास चालू केला. दुपारी 12 वाजता इंग्रजी विषयाचे ऑनलाईन अध्यापन करतात तर संध्याकाळी ‘चला स्कॉलर होऊ या ‘ या ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लास मध्ये गणित विषय शिकवितात. अश्याप्रकारे सरांची धडपड आम्ही स्वतः जवळून पाहिलेलं आहे.
आजपर्यंत सरांनी पाच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत भाग घेतलेले आहेत त्यापैकी तीन नवोपक्रमाला जिल्ह्यातून पारितोषिक मिळालेलं आहे. त्यामध्ये संख्याची गंमत पाचवे, शब्द बँड पाचवे आणि लॉक डाऊन मधील आपली करमणूक अन विध्यार्थ्यांच्या बुद्धीचा खुराक या उपक्रमास तिसरे पारितोषिक मिळाले. सर्वांच्या महितीस्तव सरांचा ‘चला स्कॉलर होऊ या ‘ हा शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर सोल्युशन पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
अश्या उपक्रमशील शिक्षकांना आजपर्यंत लातूर जिल्ह्याचा मानव विकास राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तर शब्दगंध प्रकाशनाचा राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला. 2017 मध्ये राज्यशासनाने घेतलेल्या महामित्र ऑनलाईन स्पर्धेत देगलूर विधान सभेतून प्रथम पुरस्कार मिळाला. असे कृतत्ववान शिक्षक आणि उपक्रमशील शिक्षक मला मिळाले त्याबद्दल सरांसाठी THANKS म्हणू इच्छिते. सर्वांना असेच शिक्षक मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करते.

नाव – छाया सुधाकर भेदे (सरांची विद्यार्थीनी)
वर्ग – सहावा
शाळा – जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी

ताज्या बातम्या