कै.के.रामलू साहेबांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
             कुंडलवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कै.के. रामलू कोटलावार यांच्या 25 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून के. रामलू पब्लिक स्कूल येथे निबंध स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, संचालिका सौ रमा ठक्कूवार तर प्रमुख पाहुणे म्हणून के. रामलू साहेबांचे नातू नागेश कोटलावार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात मागे झालेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आले.

 

इयत्ता सहाव्या वर्गातील कुमारी शुभदा दरबस्तेवार या विद्यार्थिनीने के. रामलू साहेबांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी के.रामलू साहेबांच्या जीवनातील संघर्षमय अनुभवांचे स्पष्टीकरण केले. तर शाळेच्या अध्यक्षांनी अभ्यास, ध्यास आणि आत्मविश्वास यातून झालेल्या के.रामलू साहेबांच्या जीवन विकासा सारखे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात विकास साधावा असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे के. रामलू साहेबांच्या तिसऱ्या पिढीचे त्यांचे पंतू कु. मधुरा कोटलावार व माऊली कोटलावार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नवव्या वर्गातील श्रेयस झंपलकर व ओमकार ब्यागलवार या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक कागळे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या