मराठवाडास्तरीय निबंध स्पर्धेत पानसरे महाविद्यालयाचे यश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘ मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ‘ या विषयावर मराठवाडा स्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथील पूजा सायन्ना मामीडवार बी. कॉम तृतीय वर्षातील विद्यार्थीनींने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. त्यानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक श्रीरामे,स्टाफ सेक्रेटरी डॉ. महेश वाकरडकर , मराठी विभाग प्रमुख डॉ. सिद्धोधन कांबळे, डॉ. नारायण शिवशेट्टे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या