माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांची माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटिल अर्जुने याच्या घरी सदिच्छा भेट !

[ कुंडलवाडी वार्ताहर – अमरनाथ कांबळे ]
येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा पानसरे महाविद्यालयाची संचालक प्रकाश पाटील अर्जुने यांच्या घरी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खास दार अशोकरावजी चव्हाण साहेब. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे साहेब. माझी राज्यमंत्री तथा या भागाचे सर्वांचे आवडते नेते भास्करराव पाटील खतगावकर या सर्वांनी प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सर्वांचा अर्जुने परिवारातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र भाजप प्रदेश सदस्य बालाजी बच्चेवार उमाकांत गोपछडे नांदेड जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते तसेच बिलोली तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर व त्यांची टीम , व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दाचावार उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश पाटील मनाले की चव्हाण साहेब तुम्ही सोबत आहात म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर भरघोष मतांनी विजयी होतील अशी मी हमी देतो . आमच्या शहरसोबतच सभोवताली गावाचा विकास झाला पाहिजे, रोजगारांना काम मिळाले पाहिजे, गावातील रस्ते शहरांना जोडली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. व शेवटी शेर शायरी महणून उपस्तिथाची दाद मिळवली.
या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन तथा पानसरे विद्यालय चे सचिव सुनील शेठ बेजगमवार, कनिष्ठ महाविद्यालय चे अध्यक्ष प्रदीप आंबेकर कृषी उत्पन्न बाजार. समिती चे चैरमन बाबाराव भले संचालक नरेश सब्बनवार संचालक साईनाथ दाचावार, राम रत्नागीरे, गंगाप्रसाद गगोने काशिनाथ नारावाड.गोविंद मुंनगीलवार,संजय पाटील खुळगे गंगाधर खेळगे. संजय दमकोंडावार श्रीनिवास जिट्टावार विजय धात्रक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच परिसरातील सरपंच पोलीस पाटील. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या