मा.स्व.मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांना शिवानंद पांचाळ, सौ.शामल कळसे यांनी वाहिली श्रद्धांजली.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
 महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पणतू तथा रोटी फाउंडेशन भारत संस्थापक अध्यक्ष डॉ रोहित दादा माडेवार यांनी नागपूर येथील विधानसभा प्रांगणात अभिवादन केले, यासह रोटी फाउंडेशन मराठवाडा संपर्क कार्यालय नांदेड सह नायगांवातही अभिवादन करण्यात आले.
यावेळी रोटी फाऊंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर , महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. शामल ताई कळसे , रोटी फाऊंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते-धनंजय सूर्यवंशी, यांनी नांदेड येथील संपर्क कार्यालयात पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली, संयुक्त महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून दादासाहेब कन्नमवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम करून महाराष्ट्राची भक्कम उभारणी केली, सी.पी ॲन्ड बेरार प्रांतात त्यांनी विविध राजकीय जबाबदारी पार पाडून आयुघ निर्माणी आशिया खंडातील मोठे रुग्णालय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दादासाहेबांनी वृक्षचळवळ , भारत-चीन युद्धाच्यावेळी सैनिकांचे मनोबल वाढत‌ त्यांच्यासाठी स्वतःची सुवर्णतुला हि मदत सैनिकांना दिली.
यासारखे अनेक निर्णय घेवून महाराष्ट्र उभा केला, रोटी फाउंडेशनचे संपर्क कार्यालय नायगांव (बा) येथेही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याववेळी गोविंद पोदार तळणीकर , डॉक्टर राहुल पांचाळ, विश्वनाथ पाटील खराडे, शिवाजी पाटील मोरे , सुभाष पांचाळ, संग्राम बेलकर, सह आदींनी उपस्थित राहून‌ अभिवादन केले.
www.massmaharashtra.com 

फोटोवर क्लिक करून SUBSCRIBE करा..

ताज्या बातम्या