नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर काळाच्या पडद्याआड !

●मास महाराष्ट्र वृत्त- दि.०३•०४•२०२१
नांदेड जिल्ह्यातील एक राजबींड व्यक्तिमत्त्व, तरुणाला लाजवेल असं चेहऱ्यावर तेज व उत्साह असणारे नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर हे पडद्याआड गेले ही बातमी सोशल मीडियावर वा-यासारखी पसरली.
सरपंच ,जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ,कुंटूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार बँकचे संचालक आणि बिलोली विधानसभेचे आमदार, नांदेड लोकसभेचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इत्यादी व अनेक असे महत्त्वाचे पद भूषवलेले नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गंगाधर देशमुख कुंटूरकर यांचे निधन झाले.
यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय पोकळी निर्माण होणार आहे ती कधीच भरून निघणार नाही. कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारा नेता हरपला असच म्हणाव लागेल..

राजकारणातील अष्टपैलू अनुभवी, नेतृत्व हरवलं !….

  राजकारणातील अष्टपैलू व रुबाबदार व्यक्तिमत्व, एक दबंग नेतृत्व म्हणून, आपल्या खास वेगळ्या शैलीमध्ये नांदेड जिल्ह्यावरच नसून संपूर्ण मराठवाड्यावर एक छाप सोडणार नेतृत्व,म्हणून माजी राज्यमंत्री,माजी खासदार,श्री.गंगाधररावजी कुंटूरकर साहेबांची ओळख आहे. त्यांचे आज आपणास सोडून जाणे ही गोष्ट अगदी मनाला सुन्न करणारी आहे.एक मनमिळावू, दिलदार,अष्टपैलू व एक डॅशिंग राजकीय योद्धा हरवल्याची खंत नांदेड जिल्ह्याला आहे.
श्री.गंगाधरराव कुंटूरकर हे तेरा वर्ष नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 1997 ला ते नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले.ते राज्यमंत्री सुद्धा होते. कुंटूरकर साहेबांनी आपल्या जीवनामध्ये बरेच राजकीय चढ-उतार पाहिले, पद असो किंवा नसो, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फळी मात्र त्यांनी टिकून ठेवली.जेवढे ते वरून कणखर स्वभावाचे वाटत होते, तेवढेच ते मवाळ स्वभावाचे सुद्धा होते.गत आठ दिवसापासून ते औरंगाबाद येथे उपचार घेत असताना आज त्यांची प्राणज्योत मावळली..एक दिलदार व अनुभवी राजकीय नेतृत्व हरवल्याची खंत संपूर्ण नांदेड जिल्ह्याला राहील यात शंका नाही.

नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट द्वारे गंगाधरराव कुंटुरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.ते लिहितात की,
– “ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता आपण गमावला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली. खासदार, आमदार, राज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासमवेतही त्यांनी काम केले होते.
गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.”
शोकराव चव्हाण
नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र माजी राज्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते गंगाधररावजी देशमुख कुंटूरकर यांच सहकार व उद्योग क्षेत्रातील त्यांचे काम कायम प्रेरणा देणारे राहिल.
नांदेड जिल्हयाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी फेसबुक पोस्ट द्वारे गंगाधरराव कुंटुरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते लिहितात की, –

● पितृतूल्य नेतृत्व हरवले-प्रतापराव पा.चिखलीकर●

माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुंटूरकर साहेब यांच्या निधनामुळे आपण पितृतुल्य नेतृत्वाला मुकलो” असल्याचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या शोक संदेशात भावना व्यक्त करुन त्यांना चिखलीकर परिवार व भाजपाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण केली.

 

1992 मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचा कृषी सभापती म्हणून मला त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी लाभली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना माझ्या सारख्या तरुणाला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक पितृतूल्य नेतृत्वाला आपण गमावलो असल्याची प्रतिक्रिया खा.चिखलीकर यांनी व्यक्त केली. कुंटूरकर परिवारावर कोसळलेल्या दु:खात चिखलीकर परिवार सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.भावपूर्ण_श्रद्धांजली.”
– प्रतापराव पाटील चिखलीकर
## धक्कादायक बातमी.
हैदर हा धर्माबाद चा कुटुंरकर साहेबांचा ड्रायव्हरचा देखील आजच मृत्यू झाला. धनी आणि ड्रायव्हर एकाच दिवशी मृत्यू पावले ही वेदनादायी बातमी आहे.

ताज्या बातम्या