माजी आमदार सुभाष साबणे यांनी देगलुर तालुक्यात अतिवृष्टी ची केली पाहणी!

देगलुर बिलोली मतदार संघाचे कार्यसम्राट,उत्कृष्ट संसदपटू मा आमदार सुभाष साबणे साहेब यांनी  देगलुर तालुक्यातील हनुमान हिप्परगा, सुंडगी, तमलूर, शेळगाव, शेवाळा, व बिलोली तालुक्यातील थडी हिप्परगा, केसराळी, आदमपूर इतर गावात दोन दिवसापासुन अतिवृष्टीमुळे नदी व नाल्यांना पूर येऊन गावात पाणी शिरल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , घरे पडले व शेतातील सोयाबिन, कापुस, उडीद ईतर पिंकाचे व जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला असुन गावाला जोडणारा रस्ता खचुन गेला आहे. गावातील विद्युत वाहिणीचे पोल खाली पडले तालुक्यातील नुकसानीची पाहणी करुन या बाबत ची माहीती मा.शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते एकनाथभाई शिंदे साहेब, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण साहेब, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब,यांना फोन वर माहिती देऊन तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

यावेळी शिवसेना विधानसभा संघटक अवधुत भारती, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, शाखा प्रमुख, सर्व गावचे सरपंच, शेतकरी माता-भगीणी अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या