माजी आमदार श्री वसंतरावजी चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा होणार.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नायगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार मा. श्री वसंतरावजी चव्हाण यांचा वाढदिवस १५ ऑगष्ट २०२३ रोजी मोठ्या उत्साहात नायगांव बाजार येथे साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नायगांव, उमरी, धर्माबाद येथिल पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने विविध सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन, वसंतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र कोलंबी येथिल, जिल्हा परिषद शाळेस ५५ ( इंची) टी.व्ही. भेट म्हणुन दिली जाणार असुन तसेच कन्या शाळा नायगांव येथे R.O. वॉटर फिल्टर भेट देण्यात येणार आहे. एज्युकेशन सोसायटी नायगांव येथे शालेय साहित्य, तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. या सोबतच वसंत ग्लोबल स्कुल कापसी गुफा ता. लोहा येथे शालेय पुस्तक व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्माबाद येथील कार्यकर्त्यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे रुग्णासाठी फळे वाटप करण्यात येणार आहे.
उमरी येथे ग्रामीण रुग्णालय उमरी येथे रुग्णांसाठी फळे व चादर वाटप करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम नियोजित ठिकाणी सकाळी ९ ते १० या वेळेत होणार असुन या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम जयराज पॅलेस मंगल कार्यालय, नायगांव (बा.) येथे ह.भ.प. श्री रामराव महाराज ढोक (नागपुरकर) यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी ११ ते ०१ या वेळेत होणार असुन या दरम्यान सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन होणार आहे. आणि त्यानंतर आयोजित केलेलया धोंडे जेवन, महाप्रसादाचे आयोजन कले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील व नायगांव मतदार संघातील कार्यकर्ते, आप्तेष्ठ, मित्रमंडळी, यांनी उपस्थित राहुन किर्तन सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. अशी विनंती वसंतराव चव्हाण मित्रमंडळ नायगांव (बा.) यांच्या वतीने करण्यात येत आहे..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या