नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड संचलित नेतृत्व तपासणी केंद्र व मेडेवार यांच्या श्रीरामलिंगेश्वर ऑप्टिकल च्या संयुक्त विद्यमाने मित्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दुर्बीण द्वारे मोफत डोळेतपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

गोरगरीब नागरिकांना दृष्टी मिळावी मोफत उपचार व्हावे या उद्देशाने लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड व मेडेवार यांचे श्रीराम लिंगेश्वर ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर, दुर्बिनद्वारे मोफत नेत्र तपासणी नुकतेच संपन्न झाले यामध्ये 150 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आले तर 30 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नांदेड येथे रवाना करण्यात येणार असून यासाठी नेतृत्व चिकित्सक गजानन शेंडेराव सचिन कंधारे सोमनाथ माने आदींनी सहकार्य केले असून सदरील शिबिर नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर मेडेवार यांचे श्री राम लिंगेश्वर ऑप्टिकल येथे रुग्णांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या